कवी यशवंत देव यांचे सुरेख बोल:
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जिव उसासे वाऱ्यांचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे \
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी
स्वर आले जुळुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी
त्यांचा कसाबसा अनुवाद:
A song came from far
connecting the memories
lifeless sighs of the wind
dimmed stars in the sky
vines were quiet
leaves weren't rustling
in such a weary garden
a song came from far
connecting the memories
what echoed inside is unknown
a dark night will not brighten
without the moon
hope brought to life
in a moment the world was saved
what wrought this miracle
a song came from far
connecting the memories
विवेचन:
कवीला उदास मन थकलेल्या उद्याना प्रमाणे भासत होतं जिथे ना पानांची सळसळ होती ना वेलींची कुजबुज होती. अचानक दूर कुठून तरी गाण्याचे स्वर ऐकू आले. गाण्याशी जुळलेल्या आठवणी जाग्या झाल्या. अंधारी रात्र चंद्र किरणांनी उजळावी त्याप्रमाणे अंधारलेलं मन त्या आठवणींनी उजळून निघालं. अवसेत कधी का तम उजळे - अमावस्येच्या रात्रीचा अंधार उजळत नाही जोपर्यंत चंद्राचं आकाशात पुनरागमन होत नाही. गाण्याच्या स्वरांनी उदासीनतेचा अंधःकार दुरु झाला. निमिषात पुन्हा जग सावरले -- क्षणात मनाला पुन्हा उभारी आली.