सुविचार: Reboot Your Mind
The most meaningless trouble is caused
by holding to ready -made ideas. It happens
if someone does not return to the zero-point,
or if someone does not know the value of the
zero-point, the point where anything can be
produced. It gives birth to all things.
Hua-Ching Ni , Taoist Master
A Mindful Morning या पुस्तकातुन.
ज्याप्रमाणे शाळेचा एक तास संपला कि पुढचा तास सुरु होण्याआधी शिक्षक फळा पुसून स्वच्छ करतात. नविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर ते नीट सुरु व्हावं म्हणून कम्पुटर रिबूट करण्यात येतो. त्याप्रमाणेच रोज सकाळी मनाला नव्याने सुरवात करण्याची संधी मिळाली तर ते हि उत्तम प्रकारे चालूं शकतं. ध्यान करण्याचा उद्देश मनाची पाटी पुसून स्वच्छ करणे हा असतो जेणेकरून ते नविन दिवसाच्या घडामोडींसाठी सज्ज होईल.
जेंव्हा तुम्ही ध्यान कराल तेंव्हा मनातील विचारांकडे अशा भावनेनी पहा कि जणु ते विचार म्हणजे कारंजात थुईथूई नाचणारं पाणी आहे. मन रिसेट करायचं असेल तर त्या विचारांकडे डोळस पणे बघा. मनाने एका विचारावरून दुसऱ्या विचारावर कधी उडी मारली याकडे लक्ष द्या. सरावाने ते जमेल. दोन विचारांच्या मध्ये हळूवारपणे तुमचं मन श्वासोच्छवासाकडे वळवा. म्हणजे एका विचाराकडून दुसऱ्या विचाराकडे जाण्याआधी मधल्या काळात मनानी काय करायचं हा प्रश्न मिटेल. दोन विचारांच्या मध्ये जी रिकामी जागा असते त्यात श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. त्या रिकाम्या जागा, ती शांतता हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीला पोहोचण्याचा प्रयत्न करा जिथे मनात आवाज कमी आणि शांतता जास्त असेल. शक्य होईल तितका वेळ मग त्या स्थितीत रहा.
yesheeandmommy @gmail.com |
No comments:
Post a Comment