ठाण्याला रहात असताना आमच्या शेजारी एक शाकाहारी एकत्र कुटुंब रहायचं. खूप प्रेमळ माणसं. आमचा त्यांचा खूप घरोबा. शेजाऱ्यांच्या आडीअडचणीला ते नेहमी मदतीला धावून येत. अपार्टमेंट संस्कृती असली तरी आमच्या मजल्यावर सगळ्यांची दारं दिवसा उघडीच असायची. फक्त रात्री बंद व्हायची. माझ्या आईला लहान मुलांची फार आवड. शेजारची लहान मुलगी सतत तिच्याकडे असायची. पुढे ते दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी रहायला गेले तरी जाणं -येणं कायम राहिलं.
पण त्या कुटुंबातील स्त्रिया आमच्याकडे पाणीही पीत नसत. आम्ही दादरला रहायला गेल्यावर दिवसभरासाठी म्हणून कधी घरी आल्या तरी उपास आहे म्हणून सांगत आणि काही ख्यायच -प्यायचं नाकारत. सुरुवातीला माझ्या ते लक्षात आलं नाही. वाटायचं खरच उपास असेल. पण असं बरेचदा घडल्यावर माझी ट्यूब पेटली. आईला त्यात काही विशेष वाटत नसे. पण मला ते खटकायला लागलं. माणसांच्या भावनांपेक्षा त्या त्यांच्या सोवळ्याला जास्त महत्व देतात असं वाटायला लागलं. मग मी हि त्यांच्या घरी खाणं बंद केलं.
मला वाटत ओबामांनीही तसच करावं. कधी गेलेच दिल्लीला आणि पंतप्रधानांच्या घरी बोलवलं जेवायला तर सरळ माझा उपास आहे म्हणून सांगायच आणि बरोबर आणलेलं आपलं उकळलेलं पाणी नाहीतर वाईन पीत बसायचं.
काही शाकाहारी लोक तर कमालच करतात. बाहेरचा पिझ्झा खातात पण मांसाहारी लोकांच्या घरातलं पाणी त्यांना चालत नाही. जणू काही पिझ्झा विकणारे सॉसेज आणि पेप्परोनी पिझ्झा वेगळ्या अव्हन मध्ये भाजतात आणि ह्यांच्या चीज पिझ्झासाठी वेगळी अव्हन वापरतात…एनी वे.
आजकाल बरीच मंडळी आरोग्यासाठी स्वखुशीन शाकाहारी होतेय. अमेरिकन रेस्तोरांत्स मध्येही व्हेज ऑप्शन्स असतात. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मला काही शाकाहारी लोकांच्याबरोबर बाहेर जेवायला जायला आवडत नाही. फार बाऊ करतात काही लोकं त्यांच्या शाकाहाराचा - ह्या सॉस मध्ये मीट आहे का? त्यात अंड्याचा अंश आहे का? असं वेटरला विचारत नुसता कीस काढत बसतात - बरोबरची कंपनी किंवा जेवण एन्जॉय करणं राहिलं बाजूला. बोअर होतं!
जे पुढ्यात येईल ते चूपचाप खायचं अशी माझ्या वडिलांची शिकवण होती. प्रवासाला जाताना काहीहि बांधून बरोबर घ्यायचं नाही. जे वाटेत मिळेल ते चालवून घायचं हा नियम होता. त्यामुळेच कदाचित खाण्यापिण्याच्या बाबतीतलि एवढी चिकित्सा मला मानवत नसावी.
माझ्या इथल्या काही मैत्रिणींकडे बघितल्यावर मला वाटायला लागलय कि त्यांचा शाकाहाराचा अट्टाहास हा कुठेतरी स्वतःला असर्ट करायचा प्रकार तर नसावा. जसं एखाद्या मुस्लिम कुटुंबात आई -आज्जी कोणीच बुरखा घालत नाहीत पण एखादी कॉलेज तरुणी अचानक बुरखा घालायला लागते. माझ्या एका मैत्रीणीचं थोडसं तसच आहे.
तिच्या सासूला, आईला मुंबईत, घरात नॉनव्हेज आणलेलं चालत. त्या स्वतः बनवत नाहीत पण बाहेरून आणून घरातल्यांनी खाल्ल तर त्यांची हरकत नसते. पण हि माझी मैत्रीण न्यूयॉर्कमध्ये नवऱ्याला घरातही काही आणू देत नाही आणि बाहेर जेवायला गेल्यावर तिच्या प्लेटला नॉनव्हेजचा चुकून नुसता स्पर्श झाला तरी प्लेट बदलायला लावते.
एकदा आम्ही रेस्तोरांत जेवत होतो. तीचा मोठा मुलगा आणि नवरा मासळीवर ताव मारत होते. मुलगा तर मासे इतक्या आवडीनं खातो जणू मागच्या जन्मी कोळी असावा. ती कसली तरी भाजी प्लेट मध्ये घेऊन धाकट्या मुलाला अंगावर पाजत बसली होती. त्याला पाजत पाजता मला म्हणाली, "ह्याला मी स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन करणार आहे".
मी सध्या माझा मूळचा स्पष्टवक्तेपणा कमी करायच्या प्रयत्नात आहे म्हणून सौम्यपणे तिला म्हंटल, "तो खूप लहान आहे. मोठा झाला कि ठरवेल काय खायचं, काय नाही खायचं ते".
माझ्या मैत्रिणी मला असलं काहीतरी का ऐकवतात ते समजत नाही. मागे एकदा एक गुजराथी मैत्रीण मला म्हणाली होती, "मी माझ्या मुलीला पक्की गुज्जू करणार आहे". तिचा नवरा महाराष्ट्रीयन आहे. मुलांना कुठली भारतीय भाषा शिकवायची ह्यावरून मला वाटत नवरा -बायकोत मतभेद असावेत. तर ती मला म्हणते, "मला मराठी गाणी ऐकायला आवडतात. पण बोललेली मराठी ऐकायला आवडत नाही. म्हणून मी मुलीला पक्की गुज्जू करणार. मुलगा मराठी झाला तरी चालेल".
त्यावेळी माझी स्पष्टवक्तेपणा निर्मुलन मोहिम सुरु झाली नव्हती म्हणून मी उगिचच माझं मतप्रदर्शन करत तिला म्हंटल, "मुलींचा ओढा वडिलांकडे जास्त असतो. तू जितकी तिला गुज्जू करायला बघशील तितकी ती मुद्दाम तुला चिडवायला मराठी होत जाईल. त्यापेक्षा तू मुलावर लक्ष केंद्रित कर. त्याला गुज्जू करणं बहुतेक तुला सोप्प पडेल".
त्यादिवशी रेस्तोरांत जर पूर्वीची मी असते तर मुलाला शाकाहारी करायला निघालेल्या मैत्रिणीला मनातलं सरळ सांगून टाकलं असतं - ' तू जर म्हणाली असतीस ना कि मी ह्याला मायकेल फेल्प्स सारखा स्विमर करणार किंवा रॉजर फेडरर सारखा टेनिस प्लेअर करणार तर मला तुझा हेवा वाटला असता. पण मुलाला शाकाहारी बनवायच हेच जर तुझं ध्येय असेल तर गुड लक. कर त्याला किती शाकाहारी करतेस ते'.

No comments:
Post a Comment