अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये फार घबराट पसरली आहे. आफ्रिकेतून एक रोग इथे घुसू पहातोय. त्याला थोपवण्यासाठी कसुन प्रयत्न करण्यात येत आहेत. आफ्रिकेतून परत आलेला, त्या रोगाची लागण झालेला एखादा रुग्ण आढळला तर त्याला/ तिला तात्काळ हॉस्पीटलच्या खास एकांतवास कक्षात पाठवलं जात. त्यांना एकांतवासात घेऊन जाणारे वैद्यकीय कर्मचारी अंतराळविरांसारखे सगळं अंग झाकणारे संरक्षणात्मक कपडे घालूनच त्या रुग्णांच्या जवळपास जातात. तो रोग देशात पसरू नये ह्यासाठी सर्वतोपरीने दक्षता घेतली जात आहे. त्याची लस अजून उपलब्ध नाही. पण ती विकसीत करण्यात येत आहे अशी बातमी आहे.
काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या प्रिन्सिपलनी सर्व पालकांना ईमेल पाठवली. शाळेतील काही मुलांच्या आयांनी प्रिन्सिपलना कळवलं की त्यांना त्यांच्या मुलांच्या केसात उवा सापडल्यात. प्रिन्सिपल ईमेल मध्ये म्हणाले कि सध्या शाळेचं वेळापत्रक फार फ़ुल्ल आहे . आम्ही काही बाहेरून विशेषज्ञ आणून सगळ्या मुलांचे केस तपासु शकत नाही. तेंव्हा सर्व पालकांनी आपापल्या पाल्यांची डोकी तपासावीत (आणि बरोबर स्वतःचीही?) आणि उवा आढळल्यास तात्काळ उपाययोजना करावी. जर उपाययोजनांन संबधीत काही प्रश्न असतील किंवा मदत हवी असेल तर शाळेच्या नर्सशी संपर्क साधावा.
मुलाच्या प्राथमिक शाळेत वर्षातुन दोनदा, मोठ्या सुट्टी नंतर मुलं शाळेत परत आली कि लाईस चेकर्स येऊन सगळ्या मुलांचे केस तपासत असत. उवा आढळल्यास नर्स पलकांना फोन करीत असे.
एकदा आम्ही भारतात सुट्टी घालवून परत आल्यावर तपासणी नंतर शाळेच्या नर्सचा मला फोन आला. मी तिला भेटायला गेले. वाटलं तिला जरा समजावून सांगावं की उवा फारशा हानिकारक नसतात. त्यांच्या पासुन मुलांना इजा पोहचत नाही. उत्साहानं तिला म्हंटल, "भारतात हे कॉमन आहे. सगळ्या शाळकरी मुलींच्या केसात कधी ना कधीतरी उवा होतातच. त्याच्या एखादया बहिणीकडुन त्याला हि भेट मिळाली असावी".
ती मोठी चूक झाली. नर्सच्या चेहऱ्यावर - फारच गलिच्छ लोक दिसतायत- अशा तऱ्हेचा भाव दिसला. धडपडत स्पष्टीकरण दयायचा प्रयत्न केला - उष्ण प्रदेश आहे... घाम फार येतो…मुलींचे केस लांब असतात… तेल लावायची पद्धत आहे … वगैरे. काही फरक पडला नाही.
"उपाययोजना करावी लागेल… पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासणी होईल… उ आढळली तर ती नाहीशी होईपर्यंत शाळेत येता येणार नाही". उवांच्या बाबतीत परिचारिकेची वृत्ती फारच संकुचित वाटली. उगिच शाळा बुडायला नको म्हणून मी शाळेनी आणलेल्या लाईस चेकर्सचा सल्ला घेतला. त्यांनी मला उवां विषयी काही माहिती पत्रकं दिली, शाम्पू / कंडीशनर सारखं काहीतरी लावायला दिलं आणि त्यांच्या पावती बरोबर (आभार प्रदर्शनार्थ?) उच्या चित्राची एक छान किचेन भेट म्हणून दिली. त्यांनी दिलेल्या खास उवांच्या शाम्पूच्या मुळाशी बडीशेप आहे कि काय अशी शंका यावी इतपत त्याचं बडीशेपेच्या वासाशी साधर्म्य होतं.
आजकाल कुठल्याही आजराची लस टोचणे फार प्रचलित झालय. पोलिओ, मेननजायटीस सारख्या गंभीर आजाराच्या लशींची गोष्ट वेगळी, पण आपल्याकडे ज्यांना बालपणात होणारे सर्वसामान्य आजार असं पूर्वी मानलं जायचं त्या गालगुंड, कांजिण्यांसाठीही मुलांना शाळा- प्रवेशाच्या आधी लस टोचायला लावतात. कम्पलसरी! लस नाही टोचली तर शाळा नाही.
मुलं वयात यायला लागल्यावर ती लवकरच शरीरसंबंध सुरु करतील असं गृहीत धरून त्यातुन जे रोग पसरण्याची शक्यता असते ते पसरू नयेत म्हणून मुलांना ती माध्यमिक शाळेत असतानाच एक नवीन लस टोचायला सुरुवात करावी असा मुलांचे डॉक्टर आजकाल आग्रह करतात. अजुन ती कम्पल्सरी नाही म्हणतात. पण हि लस टोचा, ती लस टोचा हे डॉक्टरांच्याकडून ऐकल कि संभ्रम वाढतो.
हिंवाळा तोंडावर आला कि फ्लू शॉट्सच्या जाहिराती सगळीकडे झळकायला लागतात. मुलांनी आणि वयस्करांनी ते टोचून घेणं चांगल असा भरपूर प्रचार केला जातो. औषधांच्या दुकानातही फ्लू शॉट्स घ्यायची सोय करतात. म्हणजे शाम्पू आणायला जाल तेंव्हाच फ्लूची लसही टोचून घेता येते. त्यातच स्वाईन फ्लू आला कि म्हणतात नेहमीच्या फ्लू बरोबर ह्या नवीन फ्लूची लसही टोचून घ्या. लशी तरी सारख्या किती टोचत बसायच्या? काळजी वाटते! उद्या म्हणतील शाम्पू घ्यायला आलाच आहात, तर जाता जाता हि उवांची लसही घ्या टोचुन म्हणजे उवांपासुन तुमच कायमच संरक्षण होईल.
Email us: yesheeandmommy@gmail.com

No comments:
Post a Comment