Sunday, December 4, 2016

कोकण आणि दख्खन



 Dancing Girl, Golconda, late 17th century 


ताजनी त्यांच्या काही हॉटेलांचा विवांत (विव + अंत? ) केल्यापासुन आता तिथे जायला भीती वाटते. जावं कि न जावं असं होतं. उदाहरणार्थ गोव्याचं फोर्ट अग्वादा आणि मुंबईतलं प्रेसिडेंट. फोर्ट अग्वादा मध्ये जाणं टाळता येतं. त्याचा विवांत झाल्या पासून मी तिकडे गेले नाही. पण कुलाब्याच्या प्रेसिडेंटची गोष्ट वेगळी. तिथे कोकण कॅफे आहे. म्हणजे होता. म्हणजे अजूनही आहे. पण आता त्याचं रूप पालटलय जरी नांव तेच असलं तरी.

मराठी शब्दकोशात विवर्त हा शब्द सापडला. त्याचा अर्थ बदल, रूपांतर असा आहे. विवांता काही सापडला नाही. विवंचना ह्या शब्दाचा अर्थही सापडला. त्यावरुन समजलं कि विवांता मध्ये जायच्या आधी मी विवंचित होते किंवा मला विवंचना होते असं म्हणणं चूक होणार नाही.

कुठल्यातरी वेब साईट नुसार vivanta हे vividness, vivacity आणि फ्रेंच मधील bon vivant ह्या तीन शब्दांचं एकत्रीकरण आहे. असुदे. ज्यांनी बदल केला त्यांनाच खरं काय ते ठाऊक.

सध्याच्या कोकण कॅफेत प्रवेश करताच लक्षात येतं कि जेवणाच्या खोलीतली अंतर्गत सजावट बदलण्यात आलीय. सजावट बदलणं चांगलं. त्यात वाईट काहीच नाही. त्यानं ताजेपणा येतो.

वाढपी म्हणाले कि खोलीला कोकणातील घराचं रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. असेल. कोकणातील महालाचं रूप दयायचा प्रयत्न करण्यात आला असेल. कारण मी लहानपणी कोकणात बघितलेल्या घरांशी ती सजावट मिळती जुळती वाटली नाही. नाही म्हणायला खोट्या खोट्या खिडक्या आणि त्यांचे उभे लोखंडी गज बघितल्यावर मालवणच्या माझ्या आजोळच्या घरातल्या खऱ्या खऱ्या खिडक्या आठवल्या.  त्या जुन्या पध्द्तीच्या खिडक्यांना पडदे म्हणून रोमन शेड्स लावल्यात. हे म्हणजे अख्खा सिनेमा खेडवळ मराठी भाषेत आणि त्यातल्या गाण्याच्या सुरवातीला एकदम जोरदार पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत- तसला प्रकार झाला.

त्री-खंडातल्या भारतीय भोजनालयांचा बऱ्यापैकी अनुभव गाठीला असल्या मुळे कोकण कॅफेचा मेन्यू बघितल्याबरोबर माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती जेवणात पडू नये म्हणून जेवण ऑर्डर करायच्या आधी मी वाढप्याना विचारलं कि, "सरसकट सगळ्या मासे, कोंबडी, मटणाच्या रश्श्यामध्ये आता कढीपत्ता आणि मोहरी असणार का?"

तर त्यांनी मला उलट प्रश्न केला कि, "तुम्हाला कढीपत्ता आणि मोहरीची अलर्जी आहे का?"

मी हो म्हणायला हवं होतं. मासे, मटण, कोंबडीच्या रश्शात घातलेल्या कढीपत्ता आणि मोहरीची मला खरंच अलर्जी आहे. कोणाच्या स्वयंपाकाच्या पध्दतीला नावं ठेवायचा उद्देश नाही पण आमच्याकडे कढीपत्ता आणि मोहरी फक्त भाजी आणि आमटीच्या फोडणीला वापरतात किंवा फारतर कोशिंबिरीच्या फोडणीत. माशाला किंवा चिकन -मटणाला नाही.

माझी शंका खरी ठरली. वाढपी स्वयंपाकघरात जाऊन आचाऱ्यांना विचारून आले आणि म्हणाले कि, "हो,  मालवणी रस्सा आणि कोंबडी -वडे मधली कोंबडी सोडली तर बाकी सगळ्या पदार्थाना कढीपत्ता -मोहरीची फोडणी असणार." त्यांनी मला आधीचाच प्रश्न परत विचारला, "तुम्हांला कढीपत्ता आणि मोहरीची अलर्जी आहे का?"

कोकण कॅफेचं जेवण चाखुन माझी पार निराशा झाली. एकतर स्थानिक मासे कुठलेच नव्हते. ताजे बोंबील आणि सुरमई तर नव्हतीच पण मला आठवतं त्याप्रमाणे पापलेटही नसावा. मग हलवा आणि बांगडे वगैरे तर सोडूनच दया. आम्हाला कोलंबीवर, अति-गोड पन्ह्यावर आणि सुमार सोलकढी वर समाधान मानावं लागलं.

पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी अस्सल कोकणी - मालवणी पद्धतीचा मेन्यू होता. छान जेवण असायचं. कोकणी जेवण हवं असेल पण प्रसंग विशेष असेल म्हणजे नेहमीच्या खाणावळीत जाण्या इतका साधा नसेल किंवा नेहमीच्या घरातल्या लोकांपेक्षा इतर कोणाला बाहेर जेवायला न्यायचं असेल तर अशा वेळी कोकण कॅफे हा छान पर्याय होता. त्याला कढीपत्ता -मोहरीची फोडणी दयायची गरज का भासली कुणास ठाऊक.  माशाला कढीपत्त्याची फोडणी दयायची साथ दादरच्या सचिन पर्यंतही पोहचलीय असं मला मागच्या वेळी वाटलं.

चूक कदाचित माझीच असेल. कोकण म्हणजे नक्की काय हे मला माहित नसावं. मुंबईच्या दक्षिणेकडचा महाराष्ट्राच्या किनार पट्टीचा प्रदेश म्हणजे कोकण अशी माझी संकुचित समजुत होती. कोकणात इतरही काही प्रदेश मोडत असतील ह्याकडे मी कधी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे आजकालची मुलं आपण त्यांची चूक दाखवून दिल्यावर मनापासुन सॉरी म्हणायच्या ऐवजी निर्विकार चेहऱ्यांनी, खांदे उडवत आपल्याला सुनावतात तसं म्हणायचं तर, my bad!



Lady Carrying A Peacock, probably Hyderabad, late 17th to early 18th century



जसं कोकण म्हणजे काय हे मला नीट माहित नव्हतं तसंच डेक्कन म्हणजे काय हे हि हल्लीच समजलं. शाळेतल्या इभूनाला शाळेतच सोडून दिल्याचा हा परिणाम. (इभूना = तिहास +भूगोल +नागरीकशास्त्र). माझ्यासाठी डेक्कन म्हणजे पूण्यातला डेक्कन जिमखाना आणि मुंबई आणि पूण्याच्या मध्ये प्रवाशांची ने -आण करणारी डेक्कन क्वीन -एवढंच. त्यापलीकडे डेक्कन मध्ये आणखी बरच काही आहे हे मागच्या वर्षी कळलं.

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये मागल्या मे -जून मध्ये (२०१५) दख्खनच्या सुलतानांवर प्रदर्शन भरलं होतं.  Sultans of Deccan India, 1500-1700: Opulance and Fantasy नावाचं . प्रदर्शन खूप मोठठं नव्हतं. म्हणजे मेटचा अवाढव्य पसारा आणि मोठ्ठी दालनं बघितली तर त्यामानानं ह्या प्रदर्शनाचं दालन लहान होतं. पण देखणं प्रदर्शन होतं.

सोळा ते अठराव्या शतकातल्या दख्खनचं एक परिपूर्ण चित्र दर्शकांच्या डोळ्यासमोर उभारण्याचा प्रयत्न प्रदर्शनात करण्यात आला. सुलतान दख्खनला कुठून, कसे आले. त्यांनी आपल्या बरोबर काय /कोणाला आणलं. त्यांनी जे किंवा ज्यांना बरोबर आणलं त्याचा दख्खनच्या चित्रकला, शिल्पकला आणि वास्तू रचनेवर, संस्कृतीवर, समाज रचनेवर, तिथल्या व्यापारावर कसा परिणाम झाला ह्याचा सविस्तर आढावा प्रदर्शनात घेण्यात आला.

त्यानिमित्तानं त्याकाळातील मूळ दख्खनी चित्र, शिल्प, कारागिरीच्या वस्तू ज्या आता त्रिखंडात विखुरलेल्या आहेत त्यांना युरोप, भारत, अमेरिकेतील वेगवेगळया खाजगी किंवा इतर संग्रहातून न्यूयॉर्कला आणण्यात आलं. सोळा ते अठराव्या शतकाच्या दरम्यान दख्खनमध्ये निर्मिलेल्या जवळपास २०० मूळ कलाकृती प्रदर्शनात सादर करण्यात आल्या.

ऑक्सफर्ड मध्ये शिकलेल्या नवीना नजात हैदर ज्या मेटच्या इस्लामिक आर्ट विभागाच्या क्युरेटर आहेत त्यांनी आणि सॅन डिएगो म्युझियम ऑफ आर्टच्या मरिका सरदार ह्यांनी ते प्रदर्शन क्युरेट केलं होतं. हैदर यांचे आईवडील भारतीय. दिल्लीचे. म्युझियम मधली प्रदर्शन बघण्याचा मला फार अनुभव आहे अशातला भाग नाही पण अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर साकारलेलं हे प्रदर्शन खूप काळजीपूर्वक आणि प्रेमानी क्युरेट केलंय असं वाटलं.



Tree on the Island of Waqwaq, Golconda, early 17th century



मॅनहॅटन मधल्या फ़िफ्त ऍव्हेन्यूवर मेट्रोपॉलिटन म्युझियम आहे. राष्ट्राध्यक्ष केनडींच्या पत्नी जॅकी केनडी मेटच्या मोठया चाहत्या होत्या असं वाचल्याचं आठवतं. म्युझियमच्या अगदी जवळच त्या रहायच्या आणि त्यांच्या अपार्टमेंट मधून त्यांना टेंपल ऑफ डेंडुरच दर्शन व्हायचं म्हणे.

फ़िफ्त ऍव्हेन्यूच्या लोकांना टेंपल ऑफ डेंडुरच भारी कौतुक. त्या प्राचीन ईजिप्शियन मंदिराचे अवशेष १९७८ साला पासुन मेट मध्ये आहेत. पण माझी त्या मंदीराची आठवण थोडी वेगळी आहे. म्हणजे तिचा जॅकी ओ शी काही संबंध नाही.

मी अमेरिकेत तशी नविनच होते आणि आम्ही ते मंदिर बघायला गेलो. म्युझियमच्या शांत, काहीश्या अंधाऱ्या दालनातून फिरत जिथे मंदिराच्या अवशेषांची पुनर्रउभारणी केलेली आहे त्या दालनात शिरलो. ते मंदिर राहिलं एका बाजूला, आधी लक्ष वेधून घेतलं ते समोरच्या काचेच्या भिंतीनी. उन्हाळा असावा. बाहेर सूर्य तळपत होता आणि काचेपलीकडल्या हिरवळीवर असंख्य गोरी न्यूयॉर्कर मंडळी शक्य तितके कमी कपडे घालून आपापल्या चटया -ब्लँकेट्स पसरून त्यावर अंग शेकत पहुडली होती.

प्राचीन मध्य आशियायी मंदिराच्या लगत अगदी अनपेक्षितपणे झालेलं आधुनिक न्यूयॉर्कच उघडं दर्शन तेंव्हा मला धक्कादायक वाटलं होतं. सिक्युरिटी कडक व्हायच्या आधीची हि गोष्ट आहे. आता काचेपलीकडे बहुदा दृश्य /अदृश्य कुंपण असेल.



                                    Bidar and Surrounding 356 copy

 

त्यादिवशी म्युझियममध्ये शिरताना सुलतानांच्या प्रदर्शनात काय बघायला मिळेल ह्याची मला कल्पना नव्हती. थंडीचा मौसम संपला होता म्हणजे अर्थातच न्यूयॉर्कचा टुरिस्ट सिझन सुरु झाला होता. लॉबीत पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आधी त्यांच्या मधून वाट काढत, मग जागोजागी उभ्या असलेल्या धुवट रंगाच्या ग्रीक, रोमन पुतळ्यांना बाजूला ठेऊन प्रदर्शनाच्या दालनात प्रवेश केला तर नजरेत भरली ती रंगांची उधळण. स्वागताला दारात बिदर मधल्या महंमद गवानच्या मदरश्याच्या भींतीची उंच प्रतिकृती उभी होती -विटकरी पार्श्वभूमीवर गडद निळ्या रंगाचं नक्षीकाम असलेली .

तिला वळसा घालून आत गेले तर समोरच्या भिंतीवर एक मोठ्ठा फोटो होता: दक्खनमधील एका हिरव्यागार टेकडीचा. गर्द हिरव्या झाडीतुन पडझड झालेल्या किल्ल्याचे भग्न काळपट अवशेष डोकावत होते. आणि फोटोतल्या किल्ल्याच्या माथ्यावर  ठळक अक्षरात शीर्षक लिहलं होतं -  AHAMADNAGAR. 

घरातून निघताना आज म्युझियममध्ये अचानक आपलं महाराष्ट्रीय अहमदनगर समोर येईल असं वाटलं नव्हतं.

हे अशा तर्हेचे क्षण असतात ना ते काही वेगळेच असतात. म्हणजे माझ्यासाठी तरी. आपल्या भोवती गजबजलेलं अमेरिकन शहर असतं. त्याच्या मध्ये आपण असतो. आपली रोजची दिनचर्या, मानसिकता अर्थातच त्या वातावरणाशी आणि त्या शहराशी निगडीत असते. मध्येच कधीतरी एक पोस्टकार्ड येतं. म्युझियम तर्फे. अमुक एक प्रदर्शन आहे. बघायला या.

तरीही प्रदर्शनाचं नुसतं नांव वाचून मी धावत पळत ते बघायला गेले नसते. तेवढं काही सोळाव्या शतकातील सुलतानांच्याबद्दल मला कुतुहूल नव्हतं. पण त्या पोस्टकार्डवरच चित्र इतकं मोहक होतं कि नांवापेक्षाहि ते चित्र आणि त्यातले रंग बघून उत्सुकतेपोटी मी ज्या दिवशी प्रदर्शन सभासदांसाठी उघडलं त्या दिवशी सकाळीच तिथे जाऊन पोहोचले - फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणतात तसं.



पोस्टकार्डवरचं हे चित्र आणि त्यातले रंग मला इतके आवडले कि चित्रकारानी पक्षी झाडाच्या आणि खाली बांधलेल्या मेंढ्याच्या मानानं मोठा का काढला असावा हा प्रश्न माझ्या मनात डोकावलाही नाही. पण प्रदर्शनात त्या प्रश्नाचं उत्तर दयायचा प्रयत्न करण्यात आला. जगदीश आणि कमला मित्तल म्युझियम ऑफ इंडियन आर्ट, हैद्राबाद मध्ये हे मूळ चित्र आहे.


त्या  प्रदर्शनाच्या निमित्ताने एक जाडजूड ग्रंथवजा कॅटलॉग म्युझियम तर्फे प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार दक्खनच्या सुलतानांची थोडक्यात पार्श्वभूमी अशी: तेरा ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आशियावर झालेल्या मोंगोल सैन्याच्या आक्रमणामुळे तेथुन विस्थापित झालेले निर्वासित भारतात येऊन पोहोचले. दहा ते तेराव्या शतकाच्या दरम्यान मध्य अशिया आणि इराण मध्ये चालू असलेल्या सांकृतिक आणि साहित्यिक पुनरुथ्थानाच्या दरम्यान वाढलेल्या ह्या विस्थापितांनी त्या प्रभावाखाली फोफावलेली अतिशय विकसित आणि सर्वसमावेशक अशी पर्शियन संस्कृती आपल्या बरोबर आणली. ती संस्कृती उत्तर भारतात रुजली.

चौदाव्या शतकाच्या सुरवातीला दिल्लीच्या सुलतानशाहिनी जेंव्हा दख्खनवर आक्रमण केलं तेंव्हा त्यांच्या सैन्याबरोबर आलेले स्थलांतरित दौलताबादला - दख्खनच्या वायव्य परिसरात स्थिरावले. दिल्लीच्या हुकूमशाही राजवटीला कंटाळलेल्या ह्या स्थलांतरितांनी १३४७मध्ये दिल्लीच्या तख्ताशी बंडखोरी केली आणि स्वतंत्र बहामनी राजवटीची (१३४७-१५३८) स्थापना केली.

सोळाव्या शतकाच्या मध्यावर बहामनी राजवटीचा ऱ्हास झाला आणि त्यातून पाच छोटी राज्ये उभी राहिली - बिदर, अहमदनगर, बेरार, विजापूर आणि गोळकोंडा. त्यातलं पहिलं म्हणजे अहमदनगरची निजामशाही. अहमदनगर पुढे सर्व प्रकारच्या कलांचं दख्खन मधील एक प्रमुख आश्रयस्थान बनलं.

हयापैकी काही ठळक नावं - आदिल शाही, निजाम शाही वगैरे शाळेत शिकलेल्या इतिहासात कानावरून गेली होती पण इतर बरीचशी माहिती मला नवीन होती. कॅटलॉगमधील एका लेखात म्हंटलंय कि सोळाव्या शतकाच्या सुरवातीचा अहमदनगरचा पंतप्रधान मलिक अंबर हा अफ्रिकन होता आणि त्याच्या सैन्यात पूर्व आफ्रिकेतून आणलेले दहा हजार इथिओपियन गुलाम -सैनिक (हबशी) होते ज्यांचा पुढे त्या राज्यातील कला आणि वास्तुशास्त्रावर प्रभाव पडला.

कॅटलॉग खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण आहे. त्यात प्रदर्शनातली चित्र, कारागिरीच्या वस्तूंचे फोटो आणि त्या अनुषंगाने सविस्तर लेख तर आहेतच पण दख्खनमध्ये दूरवर पसरलेल्या सुलतानकालीन वास्तूंचे अतिशय आकर्षक फोटोहि आहेत. सगळे फोटो बहुदा पावसाळ्यात काढलेले असावेत. इतर मोसमात दख्खन इतकं हिरवगार दिसत असेल असं वाटत नाही.
                                                                     



Birds in a Silver River, probably Aurangabad, late 17th century



पाश्चिमात्य देशात म्युझियम्सना फार महत्व दिलं जातं. इतिहास सुरक्षित, जतन करून ठेवला जातो. आपल्या काही ऐतिहासिक  वास्तूंची दुर्दशा बघितली कि वाटतं आपण इतिहासाला पायदळी तुडवतो.

११ सप्टेंबर २००१ ला मी न्यूयॉर्कमध्येच होते. त्यादिवशी सकाळी वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दोन्ही इमारतींवर हल्ला झाला. पूढे कित्यके दिवस, आठवडे, महिने त्या घटनेचं सावट शहरावर पसरलय असं वाटलं.

एक तर दोन इमारतींचे मिळून दोनशे वीस मजले कोसळेल. बाजूच्या काही इमारतीही पडल्या. त्या धूर -धुरळयाचा जाड थर त्याभागात सगळीकडे पसरला. जवळपास तीन हजार मानवी देहांचे अवशेष त्या इमरतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

बातम्या वाचून असं वाटायचं कि अनेक आघाडयांवर मदत कार्य चालू आहे आणि सगळे त्याच कामात गुंतलेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले देहांचे अवशेष शोधायचे. त्यांची ओळख पटवून ते नातेवाईकांकडे सुपूर्द करायचे. इमारतींचे  उरलेले भाग तिथून हलवायचे. त्या परिसराची साफसफाई करायची. तिथे रहाणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांचं दैंनदिन आयुष्य लवकरात लवकर पूर्ववत सुरु करून दयायचं. ज्या लोंकाना त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला नसेल त्यांना मदत करायची. अशा अनेक कामात सरकारी यंत्रणा तेंव्हा व्यस्त वाटत होती.

त्या घटनेला आता पंधरा वर्ष झाली. पंधरा वर्षानंतर तिथे काय दिसतं?

जिथे त्या दोन मुख्य इमारती उभा होत्या त्यांच्या जागी आता पाण्याची मोठी कुंड आहेत. त्या प्रत्येकी ११० मजली इमारतींची आठवण म्हणून जवळच एक १०२ मजली मनोरा बांधलाय. त्या मनोऱ्याच्या तळघरात म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये ११ सप्टेंबर २००१ला वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या परिसरात जे काही घडलं ते लोकांच्या डोळ्यासमोर उभं कऱण्यात आलय.

प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंमध्ये नामशेष झालेल्या इमारतीचे अवशेष, पडलेल्या भिंतींचे तुकडे, लोखंडी तुळया आहेत. कुठल्या इमारतीच्या कुठल्या भिंतीचा तो भाग आहे ह्याची माहिती आहे. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विमानांचे अवशेषहि आहेत. आणि अर्थात त्या हल्ल्यात जे बळी पडले त्या लोकांचे फोटो आणि त्यांना श्रद्धांजली तर आहेच.

आमच्या सारखे जे त्यादिवशी न्यूयॉर्कमध्ये होते आणि ज्यांनी ते सगळं प्रत्यक्ष अनुभवलं त्यांची त्या दिवसाची आठवण अजून ताजी आहे. ते म्युझियम बघताना मला सारखं आश्चर्य वाटत होतं कि  ९/११ च्या त्या प्रचंड धक्कादायक आघाता नंतर लगेचच  ते सगळे अवशेष कसे काय नीट जतन करून ठेवण्यात आले असतील  - इतके नीट कि कुठल्या इमारतीच्या कुठल्या भिंतीचा हा भाग आहे आणि कुठल्या विमनाचं हे कुठलं चाक आहे हि सर्व माहिती त्या म्युझियमला भेट देणाऱ्या अनेक भावी पिढ्यांना  वर्षानुवर्षांनंतरहि समजू शकेल.

अर्थातच ते म्युझियम बघायला आणि टॉवरच्या १०२व्या मजल्यावर जायला भरपूर फी आकारण्यात येते. इतिहास फुकट बघायला मिळतो असं नाही. तो जतन करणंही स्वस्त नसावं. कारण अमेरिकेत कुठल्याच म्युझियमची तिकिटं स्वस्त नसतात. पण पुस्तकातला इतिहास जितका कंटाळवाणा वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी तो अशा चांगल्या म्युझियम मध्ये जिवंत होऊन आपल्या समोर यतो.

आणि त्यापासून आपल्याला उपयुक्त माहिती मिळू शकते. केवळ आपल्या शहराबद्दल, राज्याबद्दल किंवा देशाबद्दलच नाही तर कधीकधी आपल्या स्वतःबद्दलही. जशी मला अचानक, ध्यानीमनी नसताना दख्खनवरील प्रदर्शनात मिळाली.



Jahangir Shoots the Head of Malik Ambar, Mughal, ca. 1616



सुलतानांवरील कॅटलॉगच्या अकराव्या पानावर रिचर्ड  इटन ह्यांच्या लेखात म्हंटलंय, ".... Another prominent group attracted to military service in the sultanates was that of the Marathas, the indigenous warrior clans of the western plateau. आणि त्यानंतर काही वाक्य सोडून... In a pattern stretching back to the Bahamani era, Maratha Deshmukhs, the hereditary territorial chiefs in the western countryside, not only collected revenue and adjudicated disputes, but they also raised troops and made them available to sultans, who in turn formalized the chief's rights to specified lands, indeed many Maratha clans rose to prominence in tandem with the sultanates."

I am Maratha Deshmukh. माहेरची मी मराठा देशमुख. माझ्या माहितीतली मराठा देशमुख मंडळी म्युझियम्सच्या जवळपास फारशी फिरकत नाहीत. त्यामुळे मेट्रोपोलिटन म्युझियमच्या त्या अत्यंत आर्टसी, फॅन्सी कॅटलॉग मध्ये आमचा उल्लेख वाचून प्रथम आश्चर्य वाटलं. पण ती माहिती मोलाचीही वाटली.

मुंबई बाहेरच्या एका लहानशा खेडयात माझ्या आज्जी -आजोबांचं छान घर होतं. साधंसं पण प्रशस्त.  दोन मजली. खेड्यामधले घर कौलारू टाईप. घरापुढे अंगण. अंगणात शेवगा, आंब्याची झाडं. मागे ओसरी. तिथे पारिजातक होता.  खळ्यात गवताचे भारे रचलेले असायचे, तिथे जांभळाचं झाड होतं. खळ्याला लागून गोठा होता त्यात राजा, सरजा नावाचे बैल असायचे. बैलगाडी उभी असायची. जवळच खुराड्यात आज्जीच्या कोंबड्या बागडत असायच्या. खुरड्यावरून पुढे चालत गेलं कि मोठ्ठी हिरव्या पाण्याची विहीर होती. तिच्या भोवती चिकूची झाडं होती. कंट्री लीव्हिंग सारख्या डिझाईनच्या चकचकीत मासिकात शोभून दिसेल असा सगळा पसारा होता - अगदी घरातली टेराकोटाची लाल फरशी आणि माडीवरच्या लाकडी जमिनी सकट.

लहानपणी सुट्टीत गावी गेलं कि माझे आवडीचे उद्योग असायचे -  सकाळी उठल्यावर खुराड्यात जाऊन नाश्त्यासाठी अंडी गोळा करायची. भाताच्या कोंड्यात हात घालून अंडी शोधायला फार मजा यायची. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. पूजेसाठी ती फुलं वेचून आणायची. दुपारी जेवण झालं कि दिवाणखान्याच्या मागच्या पेरूच्या झाडावर चढुन बसायचं.

दुपारी उशिरा पाणेरी यायची. तिचं नाव मला वाटतं पार्वती पण ती विहिरीवरून पाणी भरून आणायची म्हणून पाणेरी. ती धुणं धुवायला विहिरीवर घेऊन जायची. मी तिच्या मागे जाऊन जवळ दगडावर बसून तिचं कपडे धुणं न्याहाळत असे - आजची मुलं आयपॅडच्या स्क्रीनकडे बघतात त्याच तन्मयतेनी. आजोबांचं धोतर ती दोन -तीनदा निळाच्या पाण्यात बुचकळून काढायची. मग तितक्याच वेळा त्याच्या बारीक निऱ्या करून ते घट्ट पिळायची. ती अशिक्षित आदिवासी स्त्री होती, पण धोतर धुण्याची तिची एक ठरलेली पद्धत आहे आणि त्याला एक लय आहे असं मला ते बघताना वाटायचं.

आता ते घर तिथे नाही. त्या घराचा फोटोही माझ्याकडे नाही. आपण जसे आपल्या राष्ट्रीय वास्तू जतन करण्याच्या बाबतीत उदासीन तसेच बहुधा आपल्या कौटुंबिक वास्तूंच्या बाबतीतही. त्या घराच्या रम्य आठवणी भरपूर आहेत.

ते खेडं वडिलांच्या  पूर्वजांना इनाम म्हणून मिळालंय हे मला ऐकून माहित होतं. पण मी नेहमी असं धरून चालले कि एखादया मराठा राजाकडून मिळालेलं ते इनाम असावं. कॅटलॉग मधली माहित वाचल्यावर वाटलं -  ते गांव कुठल्यातरी सुलतानाकडून आमच्या पूर्वजांना इनाम मिळालं होतं? खरंच?



All images of paintings in this post are from postcards I bought at the Met



yesheeandmommy@gmail.com

Thursday, November 10, 2016

Summer Photos























Wednesday, November 9, 2016

थोडसं निवडणूकीबद्दल

निवडणूक संपली. मी मतदान केलं नाही. मतदान करायचं नव्हतं म्हणताना निवडणूकीकडे आणि प्रचाराकडे त्रयस्थासारखं बघता आलं.

दोन्ही उमेदवार न्यूयॉर्कचे. मी हि आता न्यूयॉर्कची म्हणून खरतर दोघांच कौतुक वाटायला हवं होतं. पण तसं काही वाटलं नाही. उलट प्रचाराच्या दरम्यान जे काही कानावर पडत होतं त्यामुळे ह्या दोघांऐवजी तिसरच कोणीतरी उमेदवार असायला हवं होतं असं वाटत ऱ्हायलं.

दोन्ही पक्षांची संमेलनं, उमेदवारांमधले वादविवाद, प्रचारादरम्यानच्या सनसनाटी घडामोडी काहीच टीव्ही वर बघितलं नाही. तरीही बातम्या कानावर येत होत्या: बरेच लोक नाराज होते. काही घाबरले होते. उमेदवारांची प्रतिस्पर्ध्यावरील कठोर टीका, रोज नवीन उलट सुलट बातम्या ऐकून काही लोक प्रचाराला कंटाळले होते. कधी एकदा हे संपतंय असं बऱ्याच जणांना वाटत होतं. काहींना लाजही वाटत होती. विशेष करून एका उमेदवाराच्या वक्तव्यांची. आपल्या देशाची प्रतिमा बाहेरच्या जगासमोर  डागळली जातेय असं काहींना वाटलं. तर आमचा राष्ट्राध्यक्ष होऊ पहाणारा हा उमेदवार जे काही म्हणतोय त्याच्याशी आम्ही बिलकूल सहमत नाही, तो आमच्या विचारांचं प्रतिनिधित्व नक्कीच करत नाही असं जगाला ओरडून सांगाव असं काहींना पोटतिडकीनी वाटतंय असंही दिसलं.

तमाशा हा शब्द आपण फक्त भारतातील राजकारणाच्या बाबतीतच वापरू शकतो; अमेरिकेत उंची घरात रहाणारे, डिझाईनर सूट्स घालणारे गोरे लोक तमाशा कसा करु शकतील अशी शंका ह्या आधी जर कोणाला वाटली असेल तर ती ह्या निवडणूकीत दूर झाली असणार. जग जवळ आल्याचं हे आणखी एक चिन्ह असावं.

दोघेही उमेदवार न्यूयॉर्कचे असल्यामुळे आपल्या परिचयाचे आहेत असं उगीचच वाटत राहिलं. त्यातही डॉनल्ड ट्रम्प मूळचे न्यूयॉर्कचे. मी इथे आल्यापासुन त्यांना नेहमी टीव्ही वर पहातेय. माझ्या आवडीचा एक टॉक शो होता. म्हणजे शो अजूनही आहे पण मी आता तो बघत नाही. पूर्वी ट्रम्प कधीतरी त्या शो मध्ये पाहूणे म्हणून यायचे. मुख्याध्यापकांनी एखादया विद्यार्थ्याला आपल्या ऑफिसात बोलावलं तर तो कसा आपण किती सोज्वळ आहोत हे दाखवायचा प्रयत्न करेल तसं त्यांचं त्या वेळी वागणं असायचं.

आम्ही रहातो त्या इमारतीवर ट्रम्प हे नाव आहे तसंच शेजारच्या काही इमारतींवरही. उंचच्या उंच इमारती आहेत सगळ्या. त्यांच्या भोवतालचा परिसर गेल्या दहा -पंधरा वर्षात सुधारून खूप सुंदर करण्यात आलाय. पूर्वी इथे काहीच नव्हतं. नदीच्या काठानी जाणारी ओसाड रेल्वे लाईन होती. वीस वर्षांपूर्वी रेल्वे लाईन खाली तशीच ठेऊन त्याच्यावर इमारती बांधायला सुरवात झाली. आणि आज नागरिकांसाठी रहायला उत्तम, अनेक प्रकारच्या सुखसुविधांनी संपन्न असं ह्या भागाचं स्वरूप दिसतं. आमच्या डोळ्यासमोर हे घडलं.  डॉनल्ड ट्रम्पनी ते घडवून आणलं कि इतर कोणी ते माहित नाही पण ठळक अक्षरात नाव तर त्यांचंच आहे. म्हणून कदाचित त्यांच्या नावाची सांगड  काही लोकांच्या मनात तरी नकळत चांगल्या गोष्टींशी घातली जात असेल.

हिलरी क्लिंटन माझ्या नंतर न्यूयॉर्कला रहायला आल्या.  न्यूयॉर्क राज्यातून त्या दोनदा सेनेटर म्हणून निवंडून आल्या. त्याही अपरिचित वाटत नाहीत. अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा सन्मान आज त्यांना मिळू शकला नाही. पण  निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले त्याप्रमाणे हिलरी क्लिंटननी हि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांचे प्रयत्न, चिकाटी, धडपड कित्येक लहान मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आणि कुणास ठाऊक त्यांच्या पासून स्फूर्ती घेऊन एखादी तरुण मुलगी नजीकच्या भविषयकाळात निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि स्वबळावर - वडील, नवरा, इत्यादी, इत्यादींच्या शिवाय  - अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान पटकावेल. तो हि एका अर्थानं हिलरी क्लिंटन यांचा विजय असेल.

Wednesday, August 24, 2016

Songs of ShriKrushn


श्रीकृष्ण जयंती निमित्त काही गाजलेली कृष्ण गीते. 


पंडित कुमार गंधर्वांच्या बुलंद आवाजातली उठी उठी गोपाळा हि भूपाळी 




एकेकाळचं  गाजलेलं "डान्स सॉंग".  मराठी शाळांच्या गॅदरिंग मध्ये ह्या गाण्यावर एखादा तरी ग्रुप डान्स हमखास असायचा.          आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी




                                           आणखी एक भूपाळी घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला 




राज कपूरच्या सत्यम शिवम सुंदरम मधलं यशोमती मैय्या से बोले नंदलाला राधा क्यू गोरी मै क्यू काला . श्रीकृष्ण आई यशोदेला विचारतो, राधा का गोरी आणि मी का काळा आणि ती त्याला काही छान कारणं सांगते, तू मध्यरात्रीच्या अंधारात जन्मलास म्हणून. राधेच्या काळ्या डोळ्यानी तुला भूरळ घातली म्हणून. (Young Shri Krishn asks mother Yashoda, why is Radha fair and I am dark. And she explains with so many reasons - because you were born at midnight, because you love  Radha's dark, kohl lined eyes and so on)





गीत गाता चल मधलं सुंदर प्रेम गीत राधा का भी शाम हो तो मीरा का भी शाम 













Saturday, June 18, 2016

Tree of Music for Daughter -Kalpavruksha Kanyesathi


                                                


I was watching an old Lata Mangeshkar interview where she is reminiscing about her father, through his music. 

The interviewer asks, "It is said that you have perfect gandhar in your voice and that is a gift from your father?". 

And she explains what that means. She says, "the gandhar (ga in the seven notes) that a well-tuned tambora can produce, it is said that I can create the exact same sound with my voice." She then talks some more about who else had perfect gandhar in their voice or rather who else her father believed could create perfect gandhar (she names Bal Gandharva). 

It is an old Doordarshan interview, I think - when there used to be a fly in residence in the Mumbai DD studio- (I remember that fly...being the subject of many viewers' letters, questions, and comments at the time) - and the air conditioning was probably malfunctioning, so you see her wiping her face with her handkerchief every now and then. But she speaks with grace and joy about her father and her younger days and there is no sadness or regret that comes across for the extreme hardships and struggle - financial and otherwise that we've heard her family went through while she and her siblings were growing up. 

The story of the Mangeshkar family is very well known to maharashtrians: Dinanath Mangeshkar was born in Goa. He was an accomplished theater actor and singer of classical, semi-classical music. He had four daughters  - Lata, Asha, Usha, Meena, and a son Hridaynath. Dinanath passed away when Lata was eleven - leaving his wife and children in penury and socially shunned. The responsibility of caring for the family then fell on Lata's young shoulders -she being the oldest child. Through grit, hard work and their father's gift of music, the siblings then raised themselves out of their difficult circumstances to climb the heights of unimaginable success in the world of music. 

It is hard to put in words what maharashtrians feel about the Mangeshkars. They are a household name in the state. The two sisters are often referred to, publicly, as Latadidi and Ashatai - both the suffixes mean older sister (that's what they are called at home by their siblings , I believe). And maybe, although it isn't said openly, marathi -speakers are proud of the family for keeping the flag of marathi flying high for such a long time, in a film industry that is otherwise dominated by hindi- speaking people from the north. 

Nevertheless, after receiving generous love from mumbaikars for decades, Latabai became the subject of their ire a few years ago. The Mangeshkar family lives on Pedder road in Mumbai. It is a very busy stretch of road that cuts through some wealthy residential neighborhoods of the city taking commuters, morning and evening, from their homes in north Mumbai to Nariman Point and other business enclaves in the south and back. Some years ago, LM was accused by the media of trying to use her exalted status to block the construction of a flyover that was proposed to ease the traffic congestion. 

That furor has now passed. There is no flyover there- yet. And perhaps, one might argue, Pedder Road looks better without one. I don' know if LM still lives there. Some say she lives mostly in Pune now, where the family has built a hospital in memory of her father- the late Dinanath.  

*Kalpavruksha Kanyesathi



How often did I hear the story behind the song above from my mother growing up? - Every single time it played on the radio. That it is an expression of Lata's feelings and gratitude toward her father (written by  P. Savalaram).  Roughly translated it says:

 you planted the tree of music
for your daughter, baba
and left

it's blossomed now
will you come back to see

After you were gone
you were worshipped 
when the seven notes came alive
 your greatness became known
our home by the river
became pilgrimage 
without you 
(this) temple of riches is godless

 sun and moon are your eyes
watching over from far
nothing is lacking now
it's raining good fortune  
through your five fingers
you live on

come back just once 
and pat our back 
come back just once

*Kalpavruksha is a mythical, wish- granting tree. However, I don't think the poet would have meant it that way.  So I translated it as the tree of music. 

I am also not sure about the line - gangekathi ghar he apule - our home by the Ganga. I don't know which one of the Mangeshkar family's homes the poet was referring to.  I vaguely remember reading somewhere that they lived in Sangli at one time which is by the river Krishna. But the home that might be construed as pilgrimage -visited by many admirers and temple of riches, I thought, would be their home in Mumbai on Peddar Road which is by the Arabian sea. 




yesheeandmommy@gmail.com


Sunday, May 1, 2016

Maharashtra Diwas

      
        

On the occasion of Maharashtra Diwas (May1), a few old marathi songs :


                                        


From the movie Mumbaicha Jawai ( Son -in- law from Mumbai) - the song ka re durawa ka re abola. In the movie, a small-town girl Durga, who has grown up in a wad (big sprawling old house) gets married to a boy from Mumbai and moves to the big city only to discover that her new home is two small cramped rooms in a tenement that she has to share with two other couples - her mother and father- in- law and elder sister and brother- in- law. She frets and fumes at the lack of privacy.  Gently, with love and understanding her new family helps her adjust to her new surroundings. 

Why wasn't the movie called Mumbaichi Soon ( Daughter -in -law of Mumbai) I wonder, as the story is more about the girl and her in- laws than her husband and his in -laws. Durga's sister - in -law Manju is singing the song in the above clip.  The words - ka re abola simply mean - why aren't you talking to me?


      

Are sansar sansar is a poem by Bahinabai Choudhary that was used as song in the movie Manini. Bahinabai (1880 - 1951) was an illiterate village woman who composed poetry orally while performing her daily chores, in the farm as well as at home. They were later written down by her son Sopandev. In school we  learned one of her poems called mana wadhay wadhay. It is a beautiful poem about this mysterious thing called the mind. In it Bahinabai says mind is like a bird -one minute it is on earth and next minute it is soaring high in the sky; mind is like the waves created on water by the wind and mind can be deadly poison worse than the venom of snake or scorpio. At the end of the poem she asks rhetorically -  god, how did you come up with this thing and answers her own question saying it must be something you day -dreamed about. In are sansar sansar, Bahinabai compares sansar - domestic life - to a hot griddle on the stove. You burn your hand first she says before you get to eat the bhakari.

Bhakari eaten with raw onion, fresh green chillies or a simple spicy chutney is the staple food of rural Maharashtra. Cooked without any fat - no oil, no ghee- it is probably one of the healthiest flat breads  - especially if you make it the way it is shown in the song: Take some jwari or bajari grown in your own farm; grind it on the jata (grinding wheel) to make just enough flour to last for a week or two; knead the dough with water and flatten a small ball by hand to make a big thin round bhakari; Cook it on earthen stove.




This song jeevanat hee ghadi reminds me of a phrase my mother used to use: sadichi ghadi modayachi. New sarees especially cottons and silks come crisply folded. Sometimes when my mom bought a new saree, she would not wear it right away but save it for a special occasion or an auspicious day saying, "padvyala navin sadichi ghadi modin"- I'll break the fold of my new sari on Padwa. The first line in the above song says jeevanat hee ghadi asheech rahu de- let the fold of my life remain intact.




The handwoven silk sadi that is the pride of Maharashtra is of course the paithani named after the village Paithan near Aurangabad where they are made. The Wikipedia entry for Paithani says, one of the characteristics of that sadi is the motif of peacock woven in golden thread on its padar (part of the sadi that drapes over the shoulder). In the above song in the first line a girl is asking her aai (mother) to dress her in a new shalu (rich sadi) with dancing golden peacock on its padar. I wonder if poetically, she is in effect asking her mother for a paithani - an extravagant purchase at any age let alone for a young girl. This song is a lavani, a type of folk song from Maharashtra and is sung by Sulochna Chavan, a well known lavani singer.




No list of marathi popular songs can be complete without the above song. It would not be an exaggeration to say that generations of maharshtrian children have taken their first steps tapping their feet to the beat of this balgeet. The first line says nach re mora ambyachya vanat nach re mora nach - dance peacock dance in the mango orchard. Asha Bhosale originally sang this for the movie Devbappa over 50 years ago. Everyone knows that the Mangeshkar sisters Lata and Asha, through their sweet, melodious voice ruled the hindi playback signing world for over five decades. What is probably lesser known outside Maharashtra is that their brother Hridyanath Mangeshkar has rendered some deeply haunting soulful marathi songs like the one below:






yesheeandmommy@gmail.com















Friday, February 12, 2016

For Valentine's Day


Taj Mahal facade : Stock Photo

Recounting her first visit to India in the 1950s, in her new book My Life on the Road,  Gloria Steinem writes, " -  everybody in India seems to sing as part of everyday life  - ".  Perhaps that is the reason Indian moviemakers refuse to make movies without songs. Here are some of my favorite everlasting love songs from hindi films that have stood the test of time.


                                   


Jo wada kiya woh nibhana padega - the promise that you made, you will have to keep..., says the first line of this song. The name of the movie is Taj Mahal. In 1632 Emperor Shahajahan commissioned the construction of the Taj Mahal to house the remains of his wife Mumtaz Mahal, who died giving birth to their 14th child. For over 300 years, the grand marble mausoleum has stood over Indians, reminding us of the Mughal emperor's love for his wife. The movie was made in 1963.




The movie Hum Dono was released in 1961 starring Dev Anand and Sadhana. Both the actors are no more. Sadhana died recently, in December in Mumbai. No one thought Dev Anand would ever die -the way he kept reinventing himself acting with younger and younger heroins as he got older. Sadhana popularized the "bangs" in India and the hair style came to be known as the Sadhana cut in her days.




I think Valentine's day came to India with the advent of the internet. What TV couldn't do WWW did - introduced Indians to celebrations like Halloween and Valentine's day. Still, Halloween hasn't caught on with the middle class as much as Valentine's day has and the reason might be the same as why it has not caught on with me much - Indians like me who remember the days when there used to be actual beggars in India who would go from door to door with a begging bowl, can not get terribly excited about their children going door to door with a bowl  - even for candy.


                                     


This is a nice video.  I love it as much as the song, probably more. Rarely do you see, on Indian screen, so few colors these days.  The reason it happens here, I believe, is because this song appears in the movie as a dream sequence. As the heroin lays unconscious as a result of some serious trauma, she dreams of uniting with her beloved, finally accepting the fact that it can not happen in reality; as he is engaged to someone else. I marvel at the thought, the time, and the effort that appears to have gone into the making of this song (it was filmed outside India) and the purpose it serves in the movie. Hosh mein chahat ab aayi - love has come to its senses (both literally and figuratively as it turns out in this scene) - the male singer sings at one point.  Tukade dilake hum tum milake phirase jodenge - together we will mend the pieces of (your) broken heart, he promises towards the end of the song.

                
                                      


This is not a love song. The first track, swayamvar jhale sitech (Sita got married), in this set of Geet Ramayan, describes the wedding of Ram and Sita. The story of Ram and Sita is not presented to the children of India as a love story. Rather the story of Ram (the Ramayan) is the story of - duty first, before marital bliss or any other bliss for that matter. Nevertheless, you might hear an older village woman in India, compliment a younger couple by saying- you two match each other like Ram and Sita. And this song is full of romance - thanks to the poet/lyricist GaDiMa (Gajanan Digambar Madagulkar) who paints an elaborate scene of their wedding with his beautiful words.

Geet Ramayan is the story of the Ramayan, rendered in songs in marathi. That was the background score of my teenage years in Mumbai, as my mother would play it on the tape-recorder every morning, before we left for school. The set came in several cassettes and depending on her mood, I think, she chose the one that she wanted to play on a particular morning. Lord Ram was not worshipped as god in our home, as he is in some parts of India. For us, he was the hero of Gadimas's Geet Ramayan. There are 50 odd songs in Geet Ramayan, out of which Swayamvar jhale Siteche is one of my favorites. 

There is a marathi saying (or is it a line from a poem, I don't quite remember) that goes: je na dekhe ravi, te dekhe kavi : what the sun can not see (or as I recall our marathi teacher explaining its meaning to us in class : what the eye can not see) the poet can. True to these words Gadima sees through the scenes of Sita's swayamvar and recreates for the listener a picture so vivid, that every time I listen to this song - no matter how many times I have heard it before - I feel as if I am watching that wedding unfold right before my eyes.

In Indian mythology, princesses didn't just get married. They had swayamvar which was similar to a contest. Kings, Princes, warriors from kingdoms near and far would be invited to participate in the swayamvar, which would typically test their skills in archery and whoever won the challenge would be able to wed the princess. Personally, I like the challenge in Draupadi swayamvar more - from that other epic - the Mahabharat. It's more detailed and cleverly conceived, I feel. Relatively speaking the challenge in Sita swayamvar is simple and straightforward and Ram manages to win it by lifting and breaking the immensely heavy, divine bow without much effort. 

Swayamvar jhale siteche - the song - starts from that point onwards and describes in rich classical  language what is happening at the wedding, what the father of the bride, the bride herself and the groom are feeling and doing. There is a marathi expression - Dolyat pran aanun waat pahane - waiting for someone with your life in your eyes. In this song the poet says - Sita looks at Ram with all the strength of her being gathered in her eyes (नयनामाजी एकवटुनिया निजशक्ती सारी). I know it sounds very incongruent with today's times. The only time most people have their life in their eyes these days is probably when they are looking at the screen of their electronic device, but Geet Ramayan was written over 60 years ago.  

This post started with a verse that says -the promise that you made you will have to keep - in hindi. I will end it with a marathi line that means something similar  -  modu naka vachanas -don't break your promise. Sudhir Phadake, in his sonorous voice sings this song as evocatively as he has sung all the other songs of Geet Ramayan. Gadima may have penned the lyrics but it was Phadake's voice that brought Geet Ramayan into maharashtrian homes, who fondly referred to him as babuji.  

King Dasharath, the father of Ram has three wives -Kausalya, who is Ram's mother; Sumitra, who is the mother of Laxman and Shatrughna; and Kaikayee's son is Bharat. In the third track in the above set, Kaikayee reminds her husband of the two boons that he granted her a long time ago. After Ram returns home with his new bride and is about to be crowned as King of the kingdom of Ayodhya, Kaikayee demands that it's the right time for her to get her wishes fulfilled -warning Dasharath not to break the promise that he made. With the first wish she says, her son Bharat becomes king and with the second wish, Ram goes into exile for fourteen years. In a way this song represents a crucial point in the story of the Ramayan but this - don't break your promise - song is not for Valentine"s Day.  


स्वयंवर झाले सीतेचे (lyrics)
I am making a brave attempt here, to translate the gist of a couple of verses from the song - Swayamvar jhale Siteche.  Ram is the descendant of the Sun dynasty and Sita is the daughter of the earth. So the first line says - 

It's the union of the sky and the earth.
आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे
स्वयंवर झाले सीतेचे 

श्रीरामांनी सहज उचलले धनू शंकराचे
पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतु अंतरीचे
उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे 

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयना माजी एकवटुनिया नीज शक्ति सार
फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
ताडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासता भूमिकन्या मनोमनी लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ -पुत्रासी "

पित्राज्ञाने उठे हळू ती मंत्र मुग्ध बाला
अधिर चाल ती आधिर तीहुनी हातींची माला
With her father's permission (Sita) rises (and walks towards Ram)
her feet are eager and so is the (wedding) garland in her hand
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

निलाकाशी जशी भरावी उष:प्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधु नूपुर स्वरतालं
as the red light of dawn spreads into the blue sky
the sweet sound of (her) anklets seep into Ram.
(शास्त्रोक्त मराठीही  ऐकायला किती गोड आणि सुंदर वाटु शकते ते ह्या गाण्यात दिसतं. जसं आपण म्हणतो - एखादी गोष्ट अंगात भिनते - असं वाटतं कि गदिमांना ह्या ठिकाणी म्हणायचय कि सीतेच्या पायातल्या घुंगरांचे मधुर स्वरताल श्री रामांच्या अंगी  भिनले )
सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता 
आकाशाशी जडले नाते ऐसें धरणीचे
स्वयंवर झाले सीतेचे


yesheeandmommy@gmail.com













Tuesday, January 26, 2016

From The New Yorker


Flag of India : Stock Photo


On the occasion of India's 67th Republic Day, here is a link to a short article in The NewYorker that neatly sums up the ups and downs in the peace process between India and its next door neighbor in the past decades.

http://www.newyorker.com/news/news-desk/the-pakistani-dystopia?

"Since 9/11, according to congressional reports, U.S. taxpayers have given Pakistan at least eighteen billion dollars, much of it to the military. Last year alone, the U.S. gave Pakistan $1.5 billion dollars. Isn’t it about time we asked ourselves whether this is a good idea?" - From The Pakistani Dystopia in The New Yorker 





Sunday, January 10, 2016

PK to Piku - Top 10 Songs of 2015

at No. 10 is Chaar kadam from PK:


PK is technically not a 2015 movie. It was released in December 2014. But I saw it in 2015 and Amir Khan managed to keep himself in the news through 2015 and the song is good even if the movie was bad. So I guess it is okay to include it here.

My liking for Amir Khan ebbs and flows with his good and bad movies and songs. From his very first movie and the song that made him famous papa kehate hai, where I thought he was a good new actor. Then Aati kya khandala with Rani Mukhrjee from the movie Ghulam, which I saw mostly in clips shown on the Sunday morning Indian TV shows in New York, was a cute and different song from most we see in hindi films. I didn't like Lagaan despite all the hype and hoopla that surrounded it and never understood why Amir Khan craved an Oscar for that movie so much. Then came Three Idiots which was the first hindi movie my son ever saw and he loved it. Taare Zamin Par was not bad either even though like PK that was a overtly "message" movie.

But PK is a boring film. If you have to explain what you are doing in the movie to the audience like Amir Khan does repeatedly in PK ( "phir hum idhar gaya - udhar gaya", "hamane yeh dekha, woh dekha") to an average viewer like me it says that either the script needs more work or you are trying to cram too many episodes of Satyamev Jayate into one film. OMG starring Paresh Rawal and Akshay Kumar - made probably with a much smaller budget - I thought conveyed a similar message equally effectively and in a lot more entertaining manner than PK.

It' reminded me of a black and white hindi movie I saw on Doordarshan years ago wherein there was a scene where the hero was climbing the stairs and at the same time explaining in the background voiceover (to the audience?) phir mai sidee chadhake upar gaya. And even as a young girl I thought - I can see what you are doing, why are you telling me that tum sidee chadhake upar gaya. PK is like that scene - there is too much of phir mai sidee chadhake uppar gaya type of explaining in that movie.

There was another movie that came out in 2015 that had a character explaining the story to the audience. This time the character was a dog (in PK it was Amir Khan as an alien from outer space) . The movie was Dil Dhadakane Do. And I don't know if it is just an odd coincidence but the voice of the dog explaining the story of Dil Dhadakane Do to the audience is that of Amir Khan's.


at No 9 is Gerua from Dilwale:


Some shots in this video reminded me of the song Kismat se from Pukar - Madhuri Dixit in a pale sky blue (what looks like a beautiful chiffon) saree and Anil Kapoor in a dark overcoat and nothing else but a barren snow-covered landscape stretched beyond horizon behind them made for some stunning visuals in that video.  Gerua is nowhere near as serene as Kismat Se - too many rapid changes in scenery, locales, costumes and colors in a 4 minute video assault your senses. But I wondered if shots of kajol in a clinging plain pastel with pallu flying in the air were not inspired by Madhuri Dixit in  Kismat Se.  

In Bajirao Mastani, which was released around the same time as Dilwale, Bhansali seems to have been inspired by his own movie Devadas. Watching the Pinga song from his new film, I couldn't help but notice the similarities between it and his Dola re song from Devdas. First of all aren't the situations similar - two women - in Bajirao Mistani it's kashibai, the wife and Mastani, the lover of Bajirao dancing happily together. In Devdas its Paro and Changdramukhi - the two women in Devdaas's life dancing happily together. Bhansali has toned down the colors and the gaudiness of Dola re in Pinga, but to me the two songs still look more similar than different.

When I saw the song and dance Malhari and heard Bajirao singing the words "dushmanki ... waat lavali",  I almost expected him to mouth, somewhere in the movie, dialogue akin to, "aata majhi satkali". Mercifully, that did not happen! But Malhari with its  filmed -indoors - all -male- dance doesn't look ny different from any of the bar songs we have seen in hindi films over the years.


at No 8 is Hamari adhuri kahani:


The basic premise of this movie makes sense- a woman abandoned by her husband is so trapped in tradition that she is unable to break herself free off the shackles of her non-existent marriage when she meets a man who loves her and wants to be a father to her son. What doesn't make sense is the story of the husband - where does he go, how does he get involved with the naxalites, is he a good or a bad guy- that part of the story feels confused and confusing. But the title song is good - even though this video looks as jumbled up as the story of the husband. Also to me Emran Hashmi and Vidya Balan as a romantic pair seemed even more of a mismatch than Deepika Padukone and Irfaan Khan in Piku. And as an aside, in Mumbai there is a well known college called  Ruparel  (रुपारेल) College, so when Vidya Balan addresses Hashmi as Mr Ruprel ("मिस्टर रुप्रेल, मिस्टर रुप्रेल") in the movie,  I wondered if she was mispronouncing the name Ruparel.


at No 7 is Shaam Shaandaar from Shaandaar:


If it were up to me this song would not have made it to the top 10 list.  It's my son's choice. And since his contribution to the post in invaluable, I have to include his choice here. He wanted this to be at No 1 but I couldn't place it at the top. I think the video is pretty bad.


at No 6 is the Journey song from Piku:


Piku is a nice, funny movie. I could totally relate to Amitabh Bachchan's character. It reminded me of my grandmother who suffered from the same malady as Bachchan does in the movie.  For some older members of my family, the biggest concern of the morning used to be आज पोट साफ झालं कि नाही झालं? Or होणार कि नाही होणार? On most days the answer would be नाही झालं and the rest of the morning would then be devoted to turning that नाही झालं into झालं as it is in the movie..  There are several natural remedies recommended in the movie by Irfan's character to turn नाही झालं into झालं as were discussed in my family. The "chair" part looked familiar too.


at No 5 is Afghan jalebi from Phantom:



at No 4 is Zindagi kuch to bata from Bajarangi Bhaijaan:


Bajarangi Bhaijaan is also a "message ' movie in a way but sugar coated with pure light -hearted entertainment.


at No 3 is Bhardo Jholi from Bajarangi Bhaijaan:



at No. 2 is Sapna Jahan from Brothers:



at No 1 is DJwaley babu:


This isn't necessarily the best song but it is different from the other seriously romantic songs. And I like the way an english word DJ is indianised here. Like in India a milkman might be called dudhwaley babu or vegetable seller - bhajiwaley babu, in this song a DJ is called DJwaleybabu. The video is average - not too bad. Is that a real TATA truck or just a prop used in the video, I wonder...


To sum up the year - we saw total 8 hindi movies in 2015. I'd rate them as follows:

Good:
Piku
Bajarangi Bhaijan

Bad:
PK
Hamari Adhuri Kahani
Dil Dhadakane Do
Welcome Back

Not sure (neither good nor bad):
Manjhi - the mountain man
Bajirao Mastani


yesheeandmommy@gmail.com